Rohit Sharma : जेव्हा पराभव होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट दु:ख देते, रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर मन मोकळं केलं...
श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेटवर 240 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी 241 धावांची गरज होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेच्या फिरकीपटूंनी सलग दुसऱ्या मॅचमध्ये भारताच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. आज श्रीलंकेचा फिरकीपटू जेफरी मेंडरसे यानं भारताच्या 6 विकेट घेतल्या. तर चारिथ असलंका यानं तीन विकेट घेतल्या.
रोहित शर्मा या पराभवाबाबत बोलताना म्हणाला की जेव्हा तुम्ही मॅचमध्ये पराभूत होता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दु:खी करत असते. फक्त 10 ओव्हरची गोष्ट नसते, जेव्हा तुम्हाला मॅच जिंकायची असते तेव्हा सातत्य राखायला लागतं.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, आम्ही सातत्य राखण्यात अपयशी ठरलो, थोडा निराश झालो आहे, मात्र असं होतं असतं, तुमच्या समोर जे आहे ते बदलायचं असतं. आम्हाला वाटलं डाव्या उजव्या फलंदाजाची जोडी फायदेशीर ठरेल. मात्र वेंडरसेनं चांगली कामगिरी केली, त्यानं सहा विकेट घेतल्या, असं रोहित म्हणाला.
आक्रमक फलंदाजी केल्यामुळं 64 धावा केल्या, मी माझं धोरण बदलणार नसल्याचं देखील तो म्हणाला. आम्हाला या खेळपट्टीची माहिती आहे, मधल्या ओव्हर्समध्ये खेळणं अवघड होऊन जातं त्यामुळं पॉवरप्लेमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला, असं रोहित शर्मा म्हणाला.