In Pics : शिर्डीच्या 5 वर्षाचा युगने वेधलं सर्वांचं लक्ष, रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड देणार क्रिकेटचे धडे
शिर्डीच्या 5 वर्षीय युग याला रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दत्तक घेत कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामीण भागातील शाळेत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या नितीन बारहाते यांचा मुलगा आहे युग.
वयाच्या पाचव्या वर्षीच उत्कृष्ट क्रिकेट खेळत असून त्याच्या खेळाची दखल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी घेतली आहे.
इतरांच्या मुलांंना प्रशिक्षण देणाऱ्या नितीन बारहाते यांना स्वतःच्या मुलाची निवड दिनेश लाड यांनी केल्याचं समजताच त्यांना मोठा आणि सुखद धक्का बसला
शिर्डी जवळील सावळीविहिर या छोट्या गावातील युग बारहाते हा 5 वर्षीय मुलाला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे.
त्याचा आदर्शही सचिन तेंडुलकर हा असून हळूहळू वडिलांबरोबर क्रिकेटचे धडे घेणाऱ्या युगच्या गुणांची दखल अखेर रोहितचे प्रक्षिक्षक दिनेश लाड यांनी घेतलं आहे.
युगच्या उपजत गुणांची दखल थेट रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी घेतली आणि त्यांनी थेट युगला दत्तक घेत क्रिकेटसह शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.
क्रिकेट विश्वात नाव कमवण्याचं अधुर राहिलेलं स्वतःच स्वप्न मुलगा पूर्ण करील असा विश्वास युगचे वडिल नितीन यांना असल्याचं यावेळी त्यांच्या डोळ्यात दिसून आलं.
परिस्थिती जेमतेम असल्याने क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या रूपाने बारहाते कुटुंबीयांना जणू काही देवच भेटल्याची भावना बारहाते कुटुंबियांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत असे अनेक हिरे असून त्यांना योग्य प्रशिक्षणाची जोड मिळायला हवी हे खरं आहे.