In pics : 6500 पोलिसांचा फौजफाटा, 1400 तात्पुरती स्वच्छतागृहे, 20 रुग्णवाहिका; कोरेगाव भीमात शौर्यदिनाची जोरदार तयारी
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासंबंधी पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारीला सुरूवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला 10 ते 12 लाख भीम अनुयायी उपस्थित राहतील असा अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने 6500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सी सी टिव्ही द्वारे देखील नजर ठेवण्यात येणार आहे.
पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.
राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असंही त्यांनी सांगितलं आहे.
त्यानुसार तयारीला सुरुवात झाली आहे. सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोविड नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता 16 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. बसेस, 1400 तात्पुरती स्वच्छतागृहे, 20 रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधेसाठी 140 वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि 5 हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. परिसरातील खाजगी रुग्णालयांना खाटा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.