बेगमसाठी बिझनेसमॅनला मारहाण, बांगलादेशचा कर्णधार शाकीबच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर अभिनेत्री फिक्या

बांगलादेशची विश्वचषकातील कामगिरी अतिशय खराब सुरु आहे. मागील 15 वर्षांपासून शाकीब बांगलादेशसाठी क्रिकेट खेळतोय. शाकीब सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तो पत्नीचे अनेक फोटो पोस्ट करत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शाकीबने गोलंदाजी आणि फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे. जगातील आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूमध्ये शाकीबचे नाव आहे. शाकीब अल हसन याची वयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलेय.

शाकीबच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर असे आहे. दोघांची लव्हस्टोरी बांगलादेशमध्ये चर्चेचा विषय ठरते. शाकीब पत्नीसोबतचे फोटो वारंवार सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
शाकीब अल हसनची पत्नी उम्मी अहमद शिशिर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिने मॉडेलिंगही केलेय. उम्मी अहमद शिशिर लग्नाआधी बांगलादेशमधून अमेरिकेला स्थाईक झाली होती.
शाकीब आणि उम्मी यांची पहिली भेट खास झाली होती. दोघांची पहिली भेट 2010 मध्ये झाली होती. शाकीब त्यावेळी काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. उम्मी अहमद शिशिर सुट्टीसाठी इंग्लंडमध्ये आली होती. यावेळी शाकीब आणि उम्मी यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
पहिल्या भेटीनंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर एकमेकांना डेटही करु लागले.
2012 मध्ये शाकीब आणि उम्मी यांनी लग्न केले. शाकीबचे पत्नीवर खूप प्रेम आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2014 मध्ये सामना होता. त्यावेळी तो सामना पाहण्यासाठी उम्मी उपस्थित होती. त्यावेळी उम्मीसोबत एका बिझनेसमॅनने छेडाछेड केली होती. त्यावेळी शाकीबला राग अनावर आला होता. शाकीबने त्या बिझनेसमॅनला मारहाण केली होती.
शाकीब आणि उम्मी यांच्या लग्नाला 11 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. वैवाहिक आयुष्यात चांगले सुरु आहे. शाकीब क्रिकेटच्या अखेरच्या टप्प्यात आहे. तो विश्वचषकानंतर निवृत्त होऊ शकतो.