World Cup : 5 दिग्गजांचा अखेरचा वर्ल्ड कप, पहिलं नाव रोहित, अन्य 4 कोण?
विश्वचषकाचा अखेरचा टप्पा सुरु झालाय. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना होणार आहे. उद्या आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. इतर सहा संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. विश्वचषकानंतर अनेकजण वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.पाहूयात पाच दिग्गज खेळाडूंबाबत...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App36 वर्षीय शाकीब अल हसन बांगलादेशसाठी पाच विश्वचषक खेळला आहे. 2023 मध्ये त्याची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. विश्वचषकानंतर शाकीब निवृत्त होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट याने आपल्या गोलंदाजानी सर्वांनाच प्रभावित केलेय. 34 वर्षीय बोल्टचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. कारण, 2028 मध्ये होणाऱ्या विश्वचषकावेळी बोल्ट 38 वर्षांचा होईल, इतक्या वर्षांपर्यंत वेगवान गोलंदाजाला फिटनेसमध्ये सातत्य ठेवता येत नाही. त्यामुळे तो निवृत्ती घेऊ शकतो.
38 वर्षीय डेविड वॉर्नर याने विश्वचषकाआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. विश्वचषकानंतर वॉर्नर निवृत्त होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे
32 वर्षीय बेन स्टोक्सने विश्वचषकाआधीच वनडेमधून निवृत्ती घेतली होती, पण वर्ल्डकपसाठी तो परतला होता. पण इंग्लंडसाठी हा विश्वचषक खास राहिला नाही. त्यामुळे विश्वचषकानंतर स्टोक्स वनडेतून पुन्हा निवृत्ती घेईल.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतो. रोहित शर्मा सध्या 36 वर्षाचा आहे. त्यामुळे पुढील विश्वचषकात खेळण्याची शक्यता नाहीच. रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केलेच आहे. त्याशिवाय त्याने आपल्या फलंदाजीनेही कमाल दाखवली आहे. नऊ सामन्यात त्याने 500 पेक्षा जास्त धावा केल्यात.