Champions Trophy 2025: पाकिस्तान बीसीसीआयशी संबंध तोडणार; लवकरच मोठे पाऊल उचलणार, ICC ला परवडणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरुन जोरदार चर्चा आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं टीम इंडिया चॅम्पियन्स ट्राफीसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचं आयसीसीला कळवलं आहे. (Image Credit-ICC)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ईमेलद्वारे कळवलं आहे. त्यामध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला येणार नाही, हे सांगण्यात आलं आहे. (Image Credit-ICC)
आता हे प्रकरण पाकिस्तान सरकार पर्यंत पोहोचलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाकिस्तानमधील सरकारसोबत आता यावर बोलणार आहे. (Image Credit-ICC)
पाकिस्तान सरकारने आयसीसी स्पर्धाच नाही, तर बीसीसीआयशी क्रिकेट संबंध तोडण्यास सांगितले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठं पाऊल उचलणार अशी माहिती समोर आली आहे. (Image Credit-ICC)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसोबत संबंध तोडल्यास याचा आयसीसीला मोठा फटका बसू शकतो. कारण भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यातून आयसीसीला सर्वाधिक महसूल मिळतो. (Image Credit-ICC)
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राजकीय संबंध पाहता बीसीसीआयनं टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होण्यास पाठवायचं की नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारवर सोपवला आहे. (Image Credit-ICC)
भारतानं 2008 नंतर पाकिस्तानसोबत द्वीपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारतानं गेल्या 17 वर्षात पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मात्र, पाकिस्तानची टीम आशिया कप आणि आयसीसीच्या स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आली होती. (Image Credit-ICC)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारत सरकारची भूमिका पाहता आगामी काळात आयसीसीच्या स्पर्धेत भारताविरुद्ध एकही मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकते. (Image Credit-ICC)