Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीच्या शश राजयोगाची निर्मिती; 3 राशींना सोन्याचे दिवस, 2025 पर्यंत जगणार राजासारखं जीवन
कर्माचं फळ देणारा शनि (Shani 2024) हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा स्थितीत, एका राशीत परत येण्यासाठी शनीला सुमारे 30 वर्षं लागतात. शनीच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीवर दीर्घकाळ राहतो.
सध्या शनि त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे, ज्यामुळे शश राजयोगाची निर्मिती झाली आहे. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. हा राजयोग 2025 पर्यंत राहील.
जेव्हा शनि कुंभ राशीतून मीन राशीत जाईल, तेव्हा राजयोग निघून जाईल. अशा स्थितीत, 2025 पर्यंतच्या काळात काही राशीचं नशीब उजळू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कुंभ रास (Aquarius) : या राशीत शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असू शकते. प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
पद आणि प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे. यासोबतच नोकरीत बढतीसह पगार वाढू शकतो. व्यवसायाशी निगडित लोकांनाही खूप फायदा होणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळू शकतं. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
धनु रास (Sagittarius) : धनु राशीसाठी 2025 पर्यंतचा काळ सुखाचा असणार आहे. तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. तुमच्या आयुष्यात अनेक आव्हानं येऊ शकतात, पण तुम्ही त्यावर सहज मात करू शकता.
कामावर सुरू असलेल्या अडचणीही आता संपू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कर्जापासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात.
वृषभ रास (Taurus) : शश राजयोगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. मालमत्ता, वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
करिअरच्या क्षेत्रातही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. अशा स्थितीत तुमच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. यासोबतच उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील.