अवघा रंग एक झाला... कार्तिकीनिमित्त पंढरीत माऊलींच्या राऊळीला फुलांचा बहर, शासकीय महापूजाही संपन्न
आज कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पार पडते. पण, यंदा निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआचारसंहितेमुळे यंदा विठुरायाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते होत आहे.
विठ्ठलाच्या महापूजेत लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर मानाचे वारकरी ठरले.
या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात.
कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं.
पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
आपल्या लाडक्या माऊलीचं गोजिरं साजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.
आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
संपूर्ण पंढरी नागरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.
अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.