BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय; 3 खेळाडूंना वगळले, बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहली आणि रोहित शर्मासह बहुतांश खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचले असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. (Image Credit-BCCI)
पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.(Image Credit-BCCI)
सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल अशी या तीन खेळाडूंची नावे आहेत. या तीन खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघातही सामील करण्यात आले होते परंतु त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. (Image Credit-BCCI)
आता इराणी कपच्या जबाबदारीमुळे सरफराज, ध्रुव आणि यश दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहेत.(Image Credit-BCCI)
एकीकडे सर्फराज खान मुंबई संघाकडून खेळणार आहे, तर दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात स्थान मिळाले आहे.(Image Credit-BCCI)
श्रेयस अय्यर, इशान किशनपासून शार्दुल ठाकूरपर्यंत भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशा आहे. हे सर्व खेळाडू इराणी चषकात चांगली कामगिरी करून पुढील मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात. (Image Credit-BCCI)
इराणी चषकाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वेळी रेस्ट ऑफ इंडियाने सौराष्ट्रला 175 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती.(Image Credit-BCCI)