Kolhapur : कोल्हापूरच्या चंदगडमध्ये आढळला 13 फुटी किंग कोब्रा
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
24 Sep 2024 08:47 PM (IST)
1
चंदगड तालुक्यातील कळसगादे गावातील शिवरामध्ये महाकाय साप असल्याची माहिती रविवारी पाटणे वनविभागाला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले.
3
त्या ठिकाणी असणारा साप हा अतिविषारी किंग कोब्रा प्रजातीचा असल्याचं दिसून आलं.
4
त्यानंतर किंग कोब्रा सापाला वनविभागाने सुरक्षितरित्या पकडून तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडलं.
5
ही कार्यवाही कोल्हापूरचे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद आणि पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
6
वनविभागाच्या बचाव पथकात प्रदीप सुतार यांच्यासह वनपाल डिसूजा, वनपाल नागवेकर , वनरक्षक अलका लोखंडे, अतुल खोराटे, वनसेवक मोहन तुपारे, चालक विश्वनाथ नार्वेकर आदी वनकर्मचारी उपस्थित होते.