बांगलादेशचा विश्वचषकात पहिल्यांदाच श्रीलंकेवर विजय
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
06 Nov 2023 11:12 PM (IST)

1
BAN vs SL Match Report : बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचं आव्हान दिलं होतं.

3
नजमल हुसेन शान्तो आणि शाकिब अल हसननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या १६९ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बांगलादेशनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
4
शान्तोनं ९० धावांची, तर शाकिबनं ८२ धावांची खेळी उभारली. त्याआधी, चरिथ असालंकानं झळकावलेल्या शतकानं श्रीलंकेला सर्व बाद २७९ धावांची मजल मारून दिली होती.
5
विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला.