Billionaires in India: सर्वाधिक अब्जाधीश भारताच्या 'या' शहरांमध्ये राहतात, यादीत अव्वल स्थानी आहे 'हे' शहर
भारतात अशी अनेक शहरे आहेत जिथे मोठ्या संख्येने अब्जाधीश राहतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोर्ब्सच्या मते, सर्वाधिक अब्जाधीश राहत असलेल्या टॉप-10 जागतिक शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूची नावे समाविष्ट आहेत. अब्जाधीशांच्या बाबतीत टॉप-6 भारतीय शहरांची नावे जाणून घ्या.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत अव्वल आहे.
फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, राधाकृष्ण दमानी असे एकूण 33 अब्जाधीश मुंबईत राहतात.
या यादीत देशाची राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सावित्री जिंदाल, शिव नाडर असे एकूण 20 अब्जाधीश दिल्लीत राहतात.
भारतातील आयटी सिटी बेंगळुरूमध्ये नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी यांसारख्या एकूण 10 अब्जाधीशांचे निवासस्थान आहे.
गौतम अदानी, पंकज पटेल असे 7 अब्जाधीश उद्योगपती अहमदाबाद, गुजरातमध्ये राहतात.
तर पुणे आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी 4 अब्जाधीश आहेत.
कोलकात्याचे नाव अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. येथे 3 अब्जाधीश राहतात.