भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरुन गोंधळ; SG, Duke अन् Kookaburra मध्ये नेमका फरक काय?
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि बांगलादेशने या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधीच चेंडूवरुन वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशचा खेळाडून लिटन दासने एसजी चेंडूची भीती वाटत असल्याचं सांगितलं आहे.
भारत आणि बांगलादेशने या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधीच चेंडूवरुन वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशचा खेळाडून लिटन दासने एसजी चेंडूची भीती वाटत असल्याचं सांगितलं आहे.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एसजी बॉल, कुकाबुरा बॉल आणि ड्यूक बॉलचा वापर केला जातो. प्रत्येक देश आपल्या आवडीनुसार कसोटी सामन्यांमध्ये या चेंडूंचा वापर करतो. जसे एसजी बॉल फक्त भारतातच वापरला जातो.
कूकाबुरा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे वापरतात, तर ड्यूक्स चेंडू इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जातो.
विशेष म्हणजे एसजी चेंडू भारतात, कूकाबुरा ऑस्ट्रेलियात आणि ड्यूक चेंडू इंग्लंडमध्ये तयार होतो. जर आपण एसजी आणि कूकाबुरामधील फरकाबद्दल बोललो तर, दोघांमधील मुख्य फरक म्हणजे शिलाई. एसजी चेंडूची शिलाई हाताने केली जाते, तर कुकाबुराची शिलाई मशीनद्वारे केली जाते.
बांगलादेशी संघ भारतात'एसजी टेस्ट बॉल'ला घाबरतो. बांगलादेशला कुकाबुरा चेंडूने खेळण्याची सवय आहे. तर पाकिस्तान दौऱ्यातही त्याने कुकाबुरा चेंडूने इतिहास रचला होता.
भारतातील खेळपट्ट्या उथळ असते, त्यामुळे एसजीसारखा चेंडू आवश्यक आहे, जो बराच काळ आकार गमावत नाही.
आशियाई खेळपट्ट्यांवर, इतर चेंडूच्या तुलनेत एसजी चेंडूसह रिव्हर्स स्विंग देखील अधिक उपलब्ध आहे.
एसजीसमोर बांगलादेशचा संघर्ष सामान्यतः भारताविरुद्ध कमकुवत कामगिरी करणाऱ्या बांगलादेश संघाची कामगिरी भारतीय खेळपट्टीवर आणखी कमकुवत ठरते. दोन्ही संघांनी आपापसात एकूण 13 सामने खेळले आहेत, ज्यात बांगलादेशी फलंदाजांची सरासरी 22.07 आहे.
भारतीय खेळपट्टीवर बांगलादेशचे फलंदाज एसजी चेंडूला सामोरे जाताच या फलंदाजांची सरासरी 20.67 वर घसरते. भारतीय खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा सामना करताना बांगलादेशच्या फलंदाजांची सरासरी केवळ 17.29 आहे.