Bollywood Movie Ban In Pakistan : बॉलिवूडच्या 'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांना पाकिस्तानमध्ये आहे बंदी, पाहा यादी...
मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. ही गुप्तहेर लग्न करून पाकिस्तानात जाते आणि पाकिस्तानी लष्कराचा कट उधळून लावण्यास भारताची मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर बाल्की दिग्दर्शित 'पॅडमॅन' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तिथल्या संस्कृतीच्या विरोधात मानला जात होता त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
'नीरजा' हा चित्रपट एअर होस्टेस नीरजा भानोटच्या बलिदानावर आधारित आहे. या चित्रपटात सोनम कपूरने नीरजाची भूमिका साकारली होती. चित्रपटात पाकिस्तानबाबत चुकीचे चित्रण असल्याचा आरोप करण्यात आला.
अभिनव सिन्हा दिग्दर्शित 'मुल्क' या चित्रपटात ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात एका भारतीय मुस्लिम कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते. दहशतवादी कृत्यात सहभागीअसल्याचा ठपका या कुटुंबावर असतो. यामुळे या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या चित्रपटावरही पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली.
कबीर खान दिग्दर्शित 'एक था टायगर' या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. आयएसआय अधिकारी कतरिना कैफच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर पूर्णपणे बंदी आहे.
आनंद एल राय दिग्दर्शित 'रांझना' या चित्रपटात एक हिंदू मुलगा एका मुस्लिम मुलीवर एकतर्फी प्रेम करतो. मुस्लिम मुलीचे दुसऱ्या एका हिंदू मुलावर प्रेम आहे. या चित्रपटात सोनम कपूर, धनुष आणि अभय देओल मुख्य भूमिकेत दिसले होते. पाकिस्तानातही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
अनिल शर्माच्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसले होते. फाळणीच्या काळातील कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एक भारतीय मुलगा एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडतो आणि विवाह करतो. पाकिस्तानमधून आपल्या पत्नीला पुन्हा मायदेशी आणतानाच संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
कबीर खान दिग्दर्शित 'फँटम' या चित्रपटात सैफ अली खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात मुंबई हल्ल्याची कथा दाखवण्यात आली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात गुंतलेल्यांना संपवण्यासाठी रॉचे अधिकारी एक योजना आखतात. पाकिस्तानमध्ये जाऊन भारतीय हेर हा दहशतवाद्यांचा खात्मा करतो. या चित्रपटावरही पाकिस्तानात बंदी आहे.