Astro Tips : तुमच्या घरातील तुळशीची पानं सांगतात तुमची आर्थिक स्थिती; 'हे' संकेत लक्षात घ्या

Astro Tips : हिंदू धर्मशास्त्रात, तुळशीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. तुळशीचे अनेक गुणधर्म आहेत.

Astro Tips

1/8
तुळशीचे आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेदात तसा त्याचा उल्लेख आढळतो.
2/8
हिंदू धर्मशास्त्रात, तुळशीला फार महत्त्व देण्यात आलं आहे.
3/8
ज्योतिष शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, तुमच्या घरातील तुळस ही तुमची आर्थिक स्थिती कशी असेल याचा संकेत देते.
4/8
अनेकदा आपण पाहिलं असेल की, आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात अचानकपणे तुळस उगवते. कधी कधी हा शुभ संकेत मानला जातो. कारण यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो.
5/8
पण, जर तुळशीचं रोप अस्वच्छ जागी उगवलं असेल तर ते रोप तिथून उखडून दुसऱ्या स्वच्छ जागी लावावे.
6/8
घरातलं तुळशीचं रोप कोमेजलं असेल पण अचानक त्याला पालवी फुटून ते हिरवंगार होऊ लागलं तर समजून जा की, लवकरच घरातील आर्थिक तंगी दूर होऊन आर्थिक भरभराट सुरु होणार आहे.
7/8
तुळशीच्या रोपाला फुलं येणं हा एका प्रकारचा शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि आर्थिक भरभराट होणार आहे.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola