Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विश्वचषकानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, बाबर आझमने कर्णधारपद सोडलं
हकालपट्टी करण्याआधी बाबर आझम याने कर्णधारपदाला रामराम ठोकलाय. विश्वचषकात फलंदाजी आणि नेतृत्वात सपशेल अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून बाबर आझम याच्या नेतृत्वावर निर्णय घेण्यात येणार होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज बाबर आझम याने पीसीबी चेअरमनची भेट घेतली. त्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करत नेतृत्व सोडल्याचे त्याने सांगितले. त्याशिवाय नेतृत्वात काय काय केले.. त्याचा पाढाही वाचला.
2019 मध्ये मला पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळाले. मागील चार वर्षांत मैदानावर आणि मैदानाबाहेर मी अनेक चढउतार पाहिले. पाकिस्तानचा सन्मान आणि आदर क्रिकेटविश्वात काय ठेवण्याचं ध्येय ठेवले. मर्यादित षटकात पाकिस्तान संघाला नंबर 1 पर्यंत पोहचवले. त्यासाठी प्रशिक्षक, सहकारी यांच्यासह सर्व चाहत्यांचा मोलाचा वाटा राहिला. माझ्या प्रवासात चाहत्यांच्या पाठिंबाही महत्वाचा आहे, असे बाबर म्हणाला.
आज मी तिन्ही प्रकारचं कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी हे कठीण आहे, पण यावेळी हा निर्णय घ्यावाच लागेल. पाकिस्तानसाठी खेळणं सुरुच ठेवणार आहे. नवीन कर्णधाराला माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. आतापर्यंत सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि चाहत्यांचे खूप सारे आभार... , असे बाबर म्हणाला.
2023 विश्वचषकात पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मोठी कामगिरी करता आली नाही. बाबर आझम याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही. बाबर आझम याने विश्वचषकात चार अर्धशतके ठोकली. पण त्यामधील तीन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला. बाबरच्या फक्त एका अर्धशतकामुळे पाकिस्तानचा विजय झालाय. विश्वचषकातील नऊ साखळी सामन्यात बाबर आझम याने चार अर्धशतकाच्या मदतीने 320 धावा केल्या. त्यामध्ये 74 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होय.