Virat Kohli Trolled : किंग कोहलीचा ऑस्ट्रेलियन मीडियाकडून अपमान, वृत्तपत्रात पहिल्या पानावर बनवलं जोकर

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीच्या चौथ्या सामन्यानंतर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन मीडियाने अपमान केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या सामन्यात विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टान्स यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाद आता पेटल्याचं दिसत आहे.
या सामन्यात पहिल्या डावात विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टान्स यांच्यात वाद झाला. 10 व्या षटकात हे घडलं आणि शांतही झालं.
मैदानातील वर्तनामुळे विराट कोहलीला आयसीसीने लेव्हल 1 मध्ये दोषी ठरवत मॅच फीच्या 20 टक्के टंड ठोठावला आहे. याशिवाय, त्याला एक डिमेरिट पाईंट देण्यात आला आहे.
या मॅचनंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन मीडियाने हा मुद्दा उचलून धरत विराट कोहलीबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापला आहे.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी विराट कोहलीवर आक्षेपार्ह पद्धतीने टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी विराट कोहलीला 'जोकर' म्हणत निर्लज्जपणासाठी सीमा ओलांडली आहे. यानंतर आता भारतीय क्रिकेट रसिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आधी याच विराट कोहलीला 'किंग' म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याला 'जोकर' संबोधत खालची पातळी गाठली आहे. यानंतर आता भारतीय चाहते सोशल मीडियावर कोहलीला पाठिंबा दर्शवत आहेत.