New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'हे' 7 संकेत दिसणं अत्यंत शुभ; घरात नांदेल सुख-समृद्धी
नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. असं म्हणतात की, नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात. या संकेतांच्या माध्यमातून तुमचं येणारं नवीन वर्ष कसं जाईल याचा अंदाज लावता येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानुसार, 2025 च्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू दिसत असेल तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. असं म्हणतात, यामुळे वर्षभर देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहणार आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून शंखनाद ऐकू येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो. याचाच अर्थ असा की, येणारा काळ चांगला जाणार आहे.
पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य, लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण येणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, यामुळे घरात सुख-शांती, समृद्धी टिकून राहते.
2025 वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात एखादा पक्षी घरटं बांधत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात.
यंदा 2025 चा पहिला दिवस बुधवारी आहे. या दिवशी हिरव्या रंगांची फळं, कपडे, चारा, पालेभाज्या किंवा अन्य वस्तू दान द्या. असं म्हणतात की, यामुळे कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते.
तसेच, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती किंवा इष्ट देवतेचं दर्शन नक्की करा. यामुळे नोकरी-व्यवसायात यश मिळतं. तसेच, जीवनात आनंद टिकून राहतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)