Astrology Dog Color : काळा, पांढरा की ब्राऊन? घरात कोणत्या रंगाचा श्वान पाळणं शुभ? वाचा ज्योतिष शास्त्रानुसार...
श्वान हा सर्वात प्रामाणिक पाळीव प्राण्यांमधला एक प्राणी आहे. त्यामुळेच अनेक लोक घरात श्वान पाळणं पसंत करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही लोक स्वत:च्या आवडीसाठी श्वान पाळतात. तर, काही लोक घराच्या सुख-शांतीसाठी तसेच, सुरक्षेसाठी घरात श्वान पाळणं पसंत करतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, घरात श्वान पाळणं फार शुभ मानतात. या ठिकाणी कोणत्या रंगाचा श्वान घरात पाळणं शुभ आहे हे जाणून घेऊयात.
खरंतर काळा असो, पांढरा किंवा ब्राऊन. कोणत्याही रंगाचा श्वान पाळणं शुभच आहे. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार, घरात काळ्या रंगाचा श्वान पाळणं फार शुभ मानलं जातं. जर तुम्ही या रंगाचा श्वान घरात पाळला तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
घरात काळ्या रंगाचा श्वान पाळल्याने संतान सुख मिळतं. त्याचबरोबर, तुमचं आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होते.
असं म्हणतात की, ज्या घरात काळ्या रंगाचा श्वान असतो त्या घराला कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.
घरात काळ्या रंगाचा श्वान पाळल्याने कोणत्याच नकारात्मक ऊर्जेचा घरात वास राहत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार, श्वानाला केतू ग्रहाचं प्रतीक मानण्यात आलं आहे. यासाठीच घरात काळ्या रंगाचा श्वान पाळल्याने, त्याची सेवा केल्याने केतू ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)