हे आहेत पुण्यातील Most Haunted Places
शनिवार वाडा- पुण्यातील महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे शनिवार वाडा. तुम्ही अनेकदा शनिवारवाड्यात गेले असाल मात्र शनिवार वाड्याची ओळख शहरातील हॉन्टेड ठिकाण म्हणूनही आहे. पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचे वातावरण होते. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे 18 व्या वर्षीच नारायणराव यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली. असे म्हणतात की, नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवितांना आवाज येतो. “काका, मला वाचवा”असा आवाज शनिवार वाड्यात येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहोळकर पुल- अठराव्या शतकात महादेवराव पेशव्यांनी हा होळकर पुल बांधला होता. तो पुल आजही चांगल्या अवस्थेत आहे. मात्र रात्री या पुलावरुन वाहतूक टाळावी, असं स्थानिकांकडून सांगण्यात येतं.
खडकी युद्ध दफनभूमी - पुण्याच्या खडकी परिसरात ही सुंदर दिसणारी दफनभूमी आहे. दिवसा ही दफनभूमी अत्यंत विलोभनीय दिसते. मात्र रात्री याच दफनभूमीतून सैनिकांच्या ओरडण्याचा आवाज येतो.
व्हिक्टरी थिएटर- पुण्याच्या कॅम्प परिसरात हे थिएटर आहे. कॅम्प परिसरात नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र व्हिक्टरी थिएटरमध्ये चित्रपट बघायचा म्हटलं तर पुणेकर आजही घाबरतात. या थिएटरमध्ये भितीदायक हसण्याचा आवाज येतो, असं म्हटलं जातं.
हॉन्टेड हाऊस- पुण्याच्या महात्मा गांधी रोडवर हे ठिकाण आहे. या ठिकाणी एका मुलीही निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर सुर्य मावळल्यावर या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पुणेकर घाबरतात.
सिंबायोसिस-विमान नगर- विमान नगरच्या शेवट हा सिंबायोसिस कॉलेजजवळ संपतो. मात्र तिथपर्यंतचा रस्ता भितीदायक आहे, असं स्थानिक लोक सांगतात. अमावस्येला किंवा किर्र अंधार असताना या रस्ताने जाऊ नका, असा सल्ला देखील स्थानिक देतात.
सिंहगड किल्ला- प्रत्येक पुणेकरांचा विकेंडचा प्लॅन विचारला तर अनेकांकडून सिंहगड असं उत्तर येईल. पुणेकरांचं हक्काचं पर्यटन स्थळ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र सिंहगडाच्या एका दारातून लहान मुलांच्या हसण्याचा आवाज येतो हेसुद्धा खरं आहे.