अजित पवार थेट वानखेडेवर, भारत-न्यूझीलंड सामन्याचा घेतला आनंद, विराटच्या फटकेबाजीवर टाळ्याही वाजवल्या
उपमुख्यमंत्री अजित पवार थेट वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. बारामतीतील भाऊबीज आटोपून अजित पवार मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच त्यांनी थेट वानखेडे मैदान गाठून भारत न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांनाही सेमीफायनलचा आनंद लुटला.
त्याशिवाय क्रीडा मंत्री संजय बनसोडे हेही यावेळी उपस्थित होते.
अजित पवार हे बारामतीमधून सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानावर आले होते.
अजित पवार यांनी कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. त्यानंतर ते वानखेडे स्टेडियममध्ये आले होते.
भारत न्यूझिलंड सेमीफायनलला (IND Vs NZ Semi-Final) अनेक सेलिब्रिटीज उपस्थित आहेत. इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच बेकहॅम ही युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळे आजच्या सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला असतील अशी माहिती आहे. जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार विविअन रिचर्डस्, अभिनेता सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात.