पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, अफगाणिस्तानने केला उलटफेर
अफगाणिस्तानच्या जिगरबाज संघानं पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, यंदाच्या विश्वचषकात दुसरा पराक्रम घडवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्ताननं याच विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून मोठी खळबळ निर्माण केली होती.
त्यापाठोपाठ आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानलाही लोळवण्याची कामगिरी बजावली आहे.
या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानला विजयासाठी ५० षटकांत २८३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी यशस्वी पाठलाग केला.
रहमान उल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह आणि कर्णधार हशमत आफ्रिदीनं जबाबादारीनं खेळ करून आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला आहे.
चेन्नई येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तान संघाने अफगाणिस्तानचा आठ विकेटने पराभव केला. पाकिस्तानला 283 धावांत रोखल्यानंतर हे आव्हान 49 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
अफगाणिस्तान संघाने याआधी गतविजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केला होता. 284 धावांच्या धावांचा बचाव करताना पाकिस्तानच्या फिल्डर्सनी खराब फिल्डिंग केली. सोपे झेल सोडले, त्यामुळे अफगाणिस्तान संघाने सहज विजय मिळवला. गुरबाज 65, जादरन 87 धावांचे योगदान दिले. तर रहमत शाह याने नाबाद 77 धावांची मॅचविनिंग खेळी केली. कर्णधार शाहीदीनेही नाबाद 44 धावांचे योगदान दिले.
पाकिस्तान संघाला पराभूत करत अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या सनसनाटी विजयानंतर गुणातलिकेत मोठा उलटफेर झाला आहे. गतविजेता इंग्लंडचा संघ तळाला फेकला गेलाय. तर दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या अफगाणिस्तान संघाने थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.