Hanshraj Raghuwanshi: गायक हंसराज रघुवंशी अडकला लग्नबंधनात; पाहा विवाह सोहळ्याचे फोटो
हंसराज रघुवंशीचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला आहे. हंसराजने कोमल सकलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
(Hanshraj Raghuwanshi/instagram)
1/8
प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला (Hanshraj Raghuwanshi) 'मेरा भोला है भंडारी' (Mera Bhola Hai Bhandari) या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली.
2/8
सध्या हंसराज रघुवंशी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हंसराज रघुवंशीचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला आहे. हंसराजने कोमल सकलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
3/8
कोमल आणि हंसराज यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4/8
हंसराज रघुवंशीने कोमल सकलानीसोबत हिमाचल प्रदेश येथील सरकाघाटमधील मंडी येथे सात फेरे घेतले. हंसराज आणि कोमल यांच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.
5/8
हंसराज रघुवंशीची पत्नी कोमल ही यूट्यूबर आहे.
6/8
हंसराज रघुवंशी आणि कोमल 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि मार्च 2023 मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती.
7/8
हंसराज आणि कोमल यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. हंसराज रघुवंशीनं त्यांच्या लग्न सोहळ्यात गोल्डन शेरवानी आणि गोल्डन पगडी असा लूक केला होता. तर रेड लेहंगा आणि ग्रीन अँड व्हाईट स्टोन ज्वेलरी या कोमलच्या लग्नसोहळ्यातील ब्रायडल लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले.
8/8
'मेरा भोला है भंडारी' या हंसराज रघुवंशीच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच 'पल पल दिल के पास' या चित्रपटातील 'आधा भी ज्यादा' हे गाणं देखील हंसराज रघुवंशीनं गायलं आहे.
Published at : 23 Oct 2023 09:31 PM (IST)