Pandharpur : नवव्या माळेला रुक्मिणी माता पसरणी पोषाखात, विठुराया ठेवणीतल्या दागिण्यांनी सजला
आज शारदीय नवरात्रीचा नवव्या माळेला रुक्मिणी मातेला पसरणी बैठक पोषाखात सजविण्यात आले असून तब्बल 22 प्रकारचे अतिशय मौल्यवान आणि ठेवणीतील दागिन्याने मातेला मढविले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या मातेची अत्यंत सुरेख पद्धतीने पसरणी बैठक करण्यात आली आहे.
कमरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या मातेची अत्यंत सुरेख पद्धतीने पसरणी बैठक करण्यात आली आहे.
रुक्मिणी मातेला पसरणी बैठकीत सजविताना सुवर्ण मुकुट , खड्याची वेणी , चिंचपेटी , तन्मणी , सोन्या मोत्यांची तानवड जोड , बाजीराव गरसोळी , मण्या मोत्यांचा पाटल्या जोड , मोठी नथ , कर्णफुलांनी सजवण्यात आलं आहे.
तसेच मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, एकदाणी, लहान शिरपेच, कंबरपट्टा , हायकोल असे 15 प्रकारचे अतिशय दुर्मिळ ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले असुन विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकानी गर्दी केली आहे.
श्री विठ्ठलाला जांभळ्या रंगाच्या मखमली अंगीवर भरजरीने नटवण्यात आलं आहे. तसेच विठुरायाच्या मागे मोरांच्या पिसांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
देवाला सजविताना सोन्याच्या मुकुट, मौल्यवान कौस्तुभ मणी, मोत्यांची कंठी, निळ्या हिऱ्याचा नाम , मोत्याचा तुरा , सोन्याचे तोडे , मोठा शिरपेच , तीन पदरी सोन्याची तुळशी माळ, सोन्याची तीन पदरी बोरमाळ या दागिण्यांनी मढवले आहे.