Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळेच्या कॉमनवेल्थमध्ये पदक विजयानंतर आई-वडिलांचा सन्मान, जिल्हाधिकाऱ्यांकडून खास सत्कार
महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच्या या कामगिरीनंतर देशभर त्याचं कौतुक होत असताना त्याच्या आई-वडिलांचाही खास सत्कार करण्यात आला आहे.
अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं होतं. एक महत्त्वाचं पदक भारताला मिळवून दिलेल्या अविनाशवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोध शर्मा यांनी अविनाश याच्या मांडवा या गावी जाऊन त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला आहे.
अविनाश साबळे याच्या आई वडिलांच्या संस्कारामुळेच अविनाश खेळात आपलं यश संपादन करू शकला त्याचबरोबर मेहनतीच्या जोरावर अविनाशने यश संपादन केल असल्याचं शर्मा म्हणाले.
जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर अविनाश साबळेचे कुटुंबिय भारावून गेले होते.
या सत्कारानंतर अविनाशसोबत आम्हालाही सन्मान मिळाला अशी भावना साबळे कुटुबियांनी व्यक्त केली
काही दिवसांपूर्वी अविनाश साबळे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम माझा कट्टावर आला असता त्याने अनेक आठवणींना उजाळा दिला.
अविनाश आता त्याचं लक्ष आगामी ऑलिम्पिक स्पर्धांवर केंद्रीत करत असून सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करेल असंही म्हणाला आहे.