Lovlina and Nikhat : बॉक्सर निखत आणि लवलिनाची दमदार कामगिरी, मिळवलं कॉमनवेल्थ गेम्स 2022 चं तिकीट
यंदा कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेच्या बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेननं एन्ट्री मिळवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉक्सर निखत जरीन हीने देखील अप्रतिम कामगिरी करत या स्पर्धेसाठी स्थान मिळवलं आहे.
भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने पायाला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी (10 जून) 48 किलो कॅटेगरीसाठीच्या ट्रायल्समधून माघार घेतली. ज्यानंतर आता लवलिना आणि निखतची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात विजय मिळवला.
निखतने तिने हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला.
तर दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्सचं तिकीट मिळवलं.
मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2018) सुवर्णपदक विजेत्या मेरीने ऐतिहासिक कामिगिरी केली होती. पण यंदा या 39 वर्षीय बॉक्सर मेरी यंदा मात्र स्पर्धेआधी ट्रायलच्या सामन्यातच जबर दुखापतग्रस्त झाली, ज्यामुळे तिला सामनाही पूर्ण करता आला नाही.
पण मेरीच्या जागी आता युवा आणि तडफदार लवलीनाने कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी एन्ट्री मिळवल्याने तिच्याकडून पदकाची अपेक्षा भारतीयांना आहे.
.निखतनेही आतापर्यंत दमदार कामगिरी केल्याने तिच्याकडूनही पदकाची अपेक्षा सर्वांनाच आहे.
कॉमनवेेल्थ गेम्सना काही दिवस शिल्लक असल्याने सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत