IND vs SA : भारताने कटकही गमावले, दक्षिण आफ्रिकेची 2-0 ने आघाडी
IND vs SA 2nd T20: हेनरिक क्लासेनच्या (Heinrich Klaasen) वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला चार विकेट्सनं पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात एक धाव करून पव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर इशान किशननं काही मोठे फटके खेळले. मात्र तो 34 धावांवर बाद झाला.
कर्णधार ऋषभ पंतनं फक्त पाच धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 40 धावा केल्या. हार्दिक पांड्याला यंदाच्या सामन्यातही काही खास कामगिरी करता आली नाही. तो नऊ धावा करून माघारी परतला.
दिनेश कार्तिकनं शेवटच्या षटकात दोन षटकार मारून संघाची धावसंख्या 140 च्या पुढे नेली. कार्तिक 21 चेंडूत 30 धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नोर्टिजेनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, कागिसो रबाडा, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
भारतानं दिलेल्या 149 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली.
भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचे रिझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेनला स्वस्तात माघारी धाडलं.
मात्र, त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हेनरिक क्लासेननं तडाखेबाज फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला. त्यानं 46 चेंडूत 81 धावा केल्या.
हेनरिक क्लासेन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरनं 15 चेंडूत 20 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून दिला.
भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.