Birth Anniversary : 1986 सालचा फुटबॉल वर्ल्डकप अर्जेटिनाला जिंकून देण्यात होता Diego Maradona यांचा सिंहाचा वाटा!
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. मॅरेडोना यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, त्यांनी 1986 मध्ये अर्जेंटिनाला मॅक्सिको येथील विश्वचषक जिंकवून दिला होता. (Photo:@maradona/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्पर्धेत त्यांनी दोन गोल केले होते जे आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोल्समध्ये मोजले जातात. (Photo:@maradona/IG)
क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड विरोधात केलेल्या या गोल्सना हँड ऑफ गॉड आणि गोल ऑफ द सेंचुरी नावाने ओळखलं जातं. (Photo:@maradona/IG)
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मॅरेडोनाला अर्जेंटिनामध्ये हिरो मानले जाते. मॅरेडोनाने 91 सामन्यांत 34 गोल केले. क्लब स्तरावर मॅरेडोनाने 588 सामन्यात 312 गोल केले. (Photo:@maradona/IG)
बार्सिलोनासाठी मॅराडोना यांना एकही युरोपियन कप जिंकता आला नाही. मॅराडोना यांना एकदाच जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून घोषित केले गेले होते. (Photo:@maradona/IG)
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मॅरेडोनाला अर्जेंटिनामध्ये हिरो मानले जाते. (Photo:@maradona/IG)
11 डिसेंबर 2017 रोजी कोलकाता येथे महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांनी म्हटलं होतं की, मी एक सामान्य फुटबॉलपटू आहे आणि म्हणून मला 'फुटबॉलचा देव' म्हणणे योग्य नाही. (Photo:@maradona/IG)
ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते. (Photo:@maradona/IG)