Suhas Yathiraj : IAS सुहास यथिराजची धमाकेदार कामगिरी, सेवा आणि खेळाचा अद्भुत संगम!
Tokyo Paralympic : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj ) इतिहास रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असलेल्या सुहासनं आज बॅडमिंटन पुरुष एकेरीत SL4 प्रकारात हे पदक जिंकलं.
अंतिम सामन्यात फ्रान्सच्या के एल माजुरनं त्याचा 21-15, 17-21, 15-21 असा पराभव केला.
पराभव जरी झाला असला तरी सुहासनं भारताला पदक मिळवून दिलं आहे.
नोएडाचा डीएम असलेला सुहास एल यथिराजनं आजच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार करुन दिली.
काल खेळलेल्या सेमीफायनल सामन्यात सुहासनं सोपा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानं डोनेशिया चे फ्रेडी सेतियावानला 31 मिनिटामध्ये सरळ सेटमध्ये 2-0 असं पराभूत केलं होतं.
पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 असा जिंकत सुहासनं फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये त्याला निराशा हाती लागली.
सुहास आयएएस अधिकारी असून ते सध्या नोयडाचे डीएम आहेत.