PHOTO : मुलगी Vamika अन् पत्नी अनुष्कासह Virat Kohli इंग्लंडसाठी रवाना

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. काल रात्री एअरपोर्टवरुन सर्व खेळाडूंचे फोटो समोर आले आहेत. यावेळी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंडला रवाना झाला. (Photo Credit : MANAV MANGALANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एअरपोर्टवर सर्व खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत बसमधून उतरताना अनुष्का शर्माचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit : MANAV MANGALANI)

एअरपोर्टवरील अनुष्का आणि विराटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी मास्क लावला आहे. तसेच वामिका अनुष्कासोबत दिसत आहे. (Photo Credit : MANAV MANGALANI)
विरुष्काची मुलगी वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. परंतु, अनुष्कानं वामिकाला कुशीत घेतल्यामुळे यावेळी चाहत्यांची निराशा झाली असून वामिकाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांना कदाचित आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Photo Credit : MANAV MANGALANI)
टीम इंडियाचे सर्वच खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबियांसोबत रवाना झाले आहेत. (Photo Credit : MANAV MANGALANI)
दरम्यान, भारताला इंग्लंडच्या साउथम्प्टनमध्ये 18 जूनपासून न्यूझीलंडच्या विरोधात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडच्या विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Photo Credit : MANAV MANGALANI)
कोरोना महामारीमध्ये इंग्लंडसाठी रवाना झालेल्या टीम इंडियाचे खेळाडू आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Photo Credit : MANAV MANGALANI)
विरुष्काबाबात बोलायचं झालं तर त्यांची मुलगी वामिका सध्या चार महिन्यांची आहे. (Photo Credit : MANAV MANGALANI)