37th National Games 2023 : योगासने -महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद, पूर्वा आणि प्राप्ती किनारे भगिनींचे दुहेरी योगदान
महाराष्ट्र संघाने एकंदर ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य अशी ८ पदके जिंकून योगासन क्रीडा प्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती किनारे भगिनींनी महिलांच्या कलात्मक दुहेरी प्रकारात १२०.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच महिला तालबद्ध दुहेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले. महिला सांघिक कलात्मक गटात महाराष्ट्राने एकूण १२१.९५ गुण मिळवून सोनेरी यश मिळवले.
उत्तराखंडला रौप्य आणि गुजरातला कांस्य पदक मिळाले. पुरुष सांघिक कलात्मक गटात महाराष्ट्राने एकूण १३०.९४ गुण मिळवून रौप्य पदक प्राप्त केले.
या संघात वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, ओम वरदाई, मनन कासलीवाल, पवन चिखले यांचा समावेश होता.
हरयाणाला सुवर्ण आणि राजस्थानला कांस्य पदक मिळाले. पुरुषांच्या तालबद्ध दुहेरी प्रकारात मनन कासलीवाल आणि ओम वरदाई यांनी १२५.२५ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले.