Marathi Serial: 'या' मराठी मालिकांच्या टायटल साँग्स प्रेक्षक आवडीने ऐकतात
मराठी मालिकांच्या आगामी एपिसोड्समध्ये काय होणार? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. मराठी मालिकेचे टायटल साँग्स देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. जाणून घेऊयात मराठी मालिकांच्या टायटल साँग्सबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुळून येती रेशीमगाठी (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेचं टायटल साँग स्वप्नील बांदोडकरनं (Swapnil Bandodkar) हे गायलं आहे.
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत प्रजाक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांनी प्रमुख भूमिका साकारली.
अशोक पत्की यांनी माझा होशील ना (Majha Hoshil Na) या मालिकेच्या टायटल साँगला संगीत दिलं आहे. आर्या आंबेकरनं हे टायटल साँग गायलं आहे. या मालिकेत गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारली.
अनेक विवाह सोहळ्यांमध्ये तसेच संगीत कार्यक्रमात होणार सून मी या घरची या मालिकेचं टायटल साँग तुम्ही ऐकत असाल. नववधु या टायटल साँगवर डान्स देखील करतात.
तेजश्री प्रधान, शशांक केतकर, रोहिणी हट्टंगडी यांनी होणार सून मी या घरची या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली.
या सुखांनो या या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेचं टायटल साँग प्रेक्षक आजही आवडीनं ऐकतात.
वादळवाट ही मालिका 2003 ते 2007 यादरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेच्या टायटल साँगनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. देवकी पंडित यांनी वादळवाट या मालिकेचं टायटल साँग गायलं होतं. तर या गाण्याचे गीतकार मंगेश कुळकर्णी हे होते. वादळवाट या मालिकेच्या टायटल साँगला अशोक पत्की यांनी संगीत दिलं होतं.