एक्स्प्लोर
Petrol-Diesel Prices: पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
1/7

तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता.
2/7

प्रत्येक पेट्रोल पंपाच्या आवारात स्वतंत्र पेट्रोल पंपांचे डीलर कोड दर्शनी भागात लावलेले असतात.
3/7

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर (https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx) पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.
4/7

देशातील काही शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आहेत. इंधनाच्या किमती शहरांनुसार वेगवेगळ्या असू शकतात.
5/7

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
6/7

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर रोज वाढत आहेत. पेट्रोलने तर आता शंभरी गाठली आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. रोज बदलणारे पेट्रोल डिझेलचे दर किती आहे हे माहिती असणेही गरजेचं आहे.
7/7

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























