यवतमाळमधून 8 लाखांचे सागवान जप्त, गुजरातमधून तस्करी सुरु असल्याचा संशय
यवतमाळच्या एका आरा मशीनवर 64 नग या अंदाजे 7.200 घनमीटर सागवान विना हॅमर मारल्याचे सागवान असल्याची माहिती यवतमाळ वन विभागाच्या पथकाला मिळाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावरून पथकाने धाड टाकून सागवान जप्त केले.
विना हॅमर सागवान यवतमाळ मध्ये आल्याने वन विभागाला आंतरराज्य तस्करीचा संशय असून त्याची पायमूळ खोडण्यास वन विभागाने सुरुवात केली.
दरम्यान या सागवानाची चौकशी सुरू केली आहे.
हे सागवान गुजरातमधून आणले की जिल्ह्यातीलच जंगलातील आहे याची चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणी आरामशिन मालक निमोदिया यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात उपवन संरक्षक धनंजय वायभासे यांना या संदर्भात विचारणा केली असता तक्रार प्राप्त झाली त्यावरून पथकाने सागवान ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे.
चौकशीनंतरच कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.