Earthquake Of Turkey: तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंपाचे भयंकर दृश्य; उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपानंतर बर्फवृष्टी, गोठवणारी थंडी ठरतेय जीवघेणी
Earthquake Of Turkey: तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे 6,200 लोकांचा मृत्यू झालाय. या भूकंपात हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत. अजूनही बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुर्कीमध्ये सुमारे 15 कोटी लोकांना भूकंपाचा फटका बसलाय. 6 हजारांहून अधिक इमारतींचं नुकसान झालंय. तीन विमानतळांची मोठ्या प्रमाणात नासधूस झालीये.
भूकंपामुळे विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे पडलेत. विमान उतरण्यासाठी किंवा उड्डाण करण्यासाठी धावपट्टी सुस्थितीत नाही. त्यामुळे इतर देशांतून येणारी मदत पोहोचण्यातही अडथळे निर्माण होतेय.
विनाशकारी भूकंपानंतर, जगातील सुमारे 84 देशांनी तुर्कीसाठी मदतीचा हात पुढे केलाय, तर भारतातील दोन एनडीआरएफ टीम देखील बचाव कार्यासाठी तुर्कीला पोहोचल्यात.
भूकंपामुळे मध्य तुर्कस्तानचा प्रदेश आणि दक्षिण पश्चिम भागाला सर्वाधिक फटका बसलाय. भारतीय लष्कराची फिरती रुग्णालयाची टीमही तुर्कीत दाखल झालीये.
भारतातून एनडीआरफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. तुर्कीच्या मदतीसाठी भारतातून विशेष विमानानं पथक पाठवण्यात आलं होतं.
भूकंपामुळे तुर्कीच्या विमानतळाची धावपट्टीही उद्ध्वस्त झालीये. त्यामुळे इतर देशांतून आलेली विमानतळं उतरण्यात अडचणी निर्माण होतायत. तुर्कीत बचाव कार्य करताना अनेक समस्या उद्भवत आहेत. गाजन सेब हे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आहे. दोन दिवसांपासून विमानतळाचा संपर्क तुटलाय.
स्थानिक ठिकाणीही हवामान खराब आहे, त्यामुळे बचाव पथकांना काम करण्यात अडचणी येत आहेत. तुर्की उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपानंतर गोठवणारी थंडी जीवघेणी ठरतेय.
स्थानिक ठिकाणीही हवामान खराब आहे, त्यामुळे बचाव पथकांना काम करण्यात अडचणी येत आहेत. तुर्की उद्धवस्त करणाऱ्या भूकंपानंतर गोठवणारी थंडी जीवघेणी ठरतेय.