Turkey Earthquake : सीरियातील विध्वसांचं भयावह दृश्य सोशल मीडियावर व्हायरल!
तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले. (Photo by Burak Kara/Getty Images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने असोसिएट (Associated Press) प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. (Photo by Burak Kara/Getty Images)
सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे. (Photo by Burak Kara/Getty Images)
NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे. (Photo by Burak Kara/Getty Images)
भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात दिला आहे. विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारताकडून तुर्कीमध्ये पोहोचला आहे. (Photo by Burak Kara/Getty Images)
यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. (Photo by Burak Kara/Getty Images)
तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी मोठा भूकंपाचा धक्का बसला हा धक्का 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यानंतरही भूकंपाचं सत्र सुरुच होतं, त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले. (Photo by Burak Kara/Getty Images)