World Tour: 'या' 10 देशांमध्ये मिळते व्हिजाशिवाय एन्ट्री! पासपोर्ट आहे ना? अहो मग फिरुन या
मालदीव : अनेकांना मालदीवमध्ये जाऊन सुट्टीचा आनंद घ्यावासा वाटतो, तुम्ही व्हिजाशिवाय 30 दिवस मालदीवमध्ये आरामदायी सुट्टी घालवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेपाळ: जर तुम्हाला पर्वतांचा देश नेपाळला भेट द्यायची असेल, तर तुम्ही येथे 90 दिवसांसाठी व्हिसाशिवाय जाऊ शकता.
स्वालबार्ड: नॉर्वे आणि उत्तर ध्रुवादरम्यान वसलेले हे ठिकाण नॉर्वेजियन बेटांचा समूह आहे. तुम्ही येथे व्हिसाशिवायही प्रवास करू शकता.
सेंट लुसिया : तुम्हाला 45 दिवसांसाठी परदेशात जायचं असेल तर सेंट लुसिया हा चांगला पर्याय असू शकतो. येथील कॅरिबियन बेटांचं मनमोहक नैसर्गिक दृश्य पर्यटकांना पर्यटनासाठी आकर्षित करतं.
श्रीलंका: श्रीलंका हा बेटांनी नटलेला एक सुंदर देश आहे, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. जर तुम्ही कमी बजेटमध्ये सर्वोत्तम लोकेशन शोधत असाल तर श्रीलंका हा एक चांगला पर्याय असू शकतो.
मॉरिशस: हिरवीगार जंगले आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला मॉरिशस हा असा देश आहे जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे तुम्हाला 60 दिवसांचा व्हिसा सहज मिळू शकतो.
थायलंड: जर तुम्हाला थायलंडला भेट द्यायची असेल तर तुम्ही व्हिसा ऑन अरायव्हलचा लाभ घेऊ शकता.
इंडोनेशिया: इंडोनेशिया एक सुंदर देश आहे, येथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. भारतीयांना इंडोनेशियामध्ये 30 दिवसांपर्यंत राहण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो.
भूतान: भूतानला भेट देण्यासाठी व्हिसा आवश्यक नाही. तुम्ही प्रवासापूर्वी किंवा विमानतळावर येण्यापूर्वी व्हिसा मिळवू शकता.
सेशेल्स: सेशेल्स हा आफ्रिकन द्वीपसमूहातील सर्वात लहान लोकसंख्या असलेला देश आहे. तुम्ही या देशात व्हिसाशिवाय सहज प्रवास करू शकता.