टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट!
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा समूहाने बुधवारी ब्रिटनमध्ये 4 अब्ज पाउंड्सच्या गुंतवणुकीत ग्लोबल बॅटरी सेल गिगाफॅक्टरी स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे
या योजनेच उद्देश ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये संक्रमणास मदत करण्याचा आहे
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशाच्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी अविश्वसनीयपणे अभिमानास्पद क्षण असं म्हणून त्यांचे स्वागत केले
यावेळी ऋषी सुनक यांनी सांगितले की हा नवा कारखाना हजारो लोकांच्या हाताला काम देईल
टाटा कंपन्यांनी, जग्वार लँड रोव्हरची मूळ कंपनी, ब्रिटीश वाहन उत्पादन उद्योगातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे
युरोपमधील सर्वात मोठ्या गिगाफॅक्टरींपैकी एक असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 4 बिलियनपेक्षा जास्त गुंतवणूक करून हजारो नोकऱ्या तयार होणार असल्याचं ट्विट करून सांगितलं आहे
गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं