World's Oldest Person Dies : जगातील सर्वात वृद्ध महिलेचं निधन; ल्यूसिल रँडन यांनी 118 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ल्यूसिल रँडन यांनी वयाच्या 118 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये (France) झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ल्यूसिल रँडन या 118 वर्षांच्या होत्या, त्यांचं 118 व्या वर्षी निधन झालं आहे.
प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी ही माहिती दिली आहे. रँडन यांचं वृद्धापकाळाने झोपेतच निधन झालं आहे.
ल्यूसिल रँडन या फ्रान्सच्या दक्षिणेकडील शहर एल्स येथे वास्तव्यास होत्या. त्यांना सिस्टर अँड्र्यू (Sister Andre) नावाने देखील ओळखलं जातं.
प्रोटेस्टंटवादी कुटुंबात त्यांच्या जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं. रँडन तीन भावांची एकुलती एक लाडकी बहिण होती.
प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी सांगितले की, रँडन यांच्या भावाचा आधीच मृत्यू झाला होता.
ल्यूसिल यांना त्यांच्या भावांकडे म्हणजे देवाच्या दारी जायचे होते. त्यामुळे ल्यूसिल यांचा मृत्यू त्यांच्यासाठी मुक्ती मिळण्यासारखं आहे.
रँडन 2021 मध्ये कोविड-19 संसर्गापासून बचावल्या होत्या.
रँडन यांच्या नर्सिंग होममधील 81 लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. पण रँडन यांना कोरोनाची बाधा झाली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या अंध होत्या आणि व्हीलचेअरवर होत्या.
असे असले तरीही रँडन त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या इतर वृद्धांची काळजी घ्यायच्या.
याआधी एप्रिल 2022 मध्ये जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानचे केन तनाका (Kane Tanaka) या महिलेचे निधन झाले होते. वयाच्या 119 व्या वर्षी केन यांनी अखेरचा श्वास घेतला.
केन यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी जपानच्या नैऋत्येकडील फुकुओका येथे झाला होता. केन यांचे नाव 2019 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. तेव्हा तनाका 116 वर्षांच्या होत्या.