World's Beautiful Airports : जगातील टॉप 5 सुंदर विमानतळं, फोटो पाहा आणि तुम्हीच ठरवा आम्ही असं का म्हणतोय...
जगातील सुंदर विमानतळं म्हटल्यावर पहिलं नाव येते ते सिंगापूरच्या चांगी विमानतळाचं. हे विमानतळ अतिशय सुंदर आहे. (Image Source : changiairport.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंगापूर चांगी विमानतळ आग्नेय आशियातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर शिल्प, उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट विवेरियम आणि वॉटरलीली गार्डन देखील आहे. (Image Source : changiairport.com)
पॅरिस विमानतळ हे फ्रान्समधील सर्वात मोठे विमानतळ असून ते एअर फ्रान्सचे मुख्य केंद्र म्हणून ओळखलं जातं. (Image Source : skytraxratings)
राजकारणी चार्ल्स डी गॉल यांच्या नावावरुन या विमानतळाचं नाव पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळ असं ठेवण्यात आलं. (Image Source : skytraxratings)
कतारचे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वोत्तम शॉपिंगसाठी ओळखलं जातं. (Image Source : DGJones)
हमाद विमानतळ वास्तुकलेचा अनोखा नमुना आहे. हे विमानतळ जगातील सर्वात जटिल विमानतळ डिझाइन म्हणून ओळखलं जातं. (Image Source : hok.com)
जपानचे टोकियो हानेदा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. हे जगातील सर्वात स्वच्छ विमानतळ आहे. (Image Source : skytraxratings)
टोकियो हानेदा विमानतळात तीन टर्मिनल्स असून हे मध्य टोकियोच्या दक्षिणेपासून 30 मिनिटे अंतरावर आहे. (Image Source : skytraxratings)
सोल इंचॉन विमानतळ हे दक्षिण कोरियातील सर्वात मोठं विमानतळ आणि जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. (Image Source : skytraxratings)
या विमानतळाला गेल्या वर्षी जागतिक विमानतळ पुरस्कारांमध्ये एअरपोर्ट ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. (Image Source : skytraxratings)