Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railway in Bhutan: आता रेल्वेने करता येणार भूतानपर्यंतचा प्रवास, 57.7 किमीचं असेल अंतर
हा रेल्वे मार्ग आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील सरपांग येथील गेलेफूला जोडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत सरकारने ईशान्येकडील प्रदेशांमध्ये रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी एकूण 1,200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
भूतान लाइव्हच्या वृत्तानुसार, भारत आणि भूतान दरम्यान रेल्वे मार्ग प्रस्थापित करण्याचं भारत सरकारचे हे पाऊल यशस्वी ठरेल.
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, आसामच्या उत्तर-पूर्व राज्यातील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफू दरम्यान 57.5 किमी लांबीचा रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च येईल.
हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास भारताने व्यक्त केला आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आम्ही भारत आणि भूतान दरम्यानच्या रेल्वे मार्गाबद्दल चर्चा करत आहोत.
यासोबतच त्यांनी म्हटलं होतं की, भारत आणि भूतान दरम्यान रेल्वे मार्ग झाल्याने भूतानमधील अनेक पर्यटन स्थळे भारतासाठी खुली होतील.
तसेच हे आसामच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही खूप चांगले ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
2018 मध्ये पहिल्यांदा भारत आणि भूतान दरम्यान रेल्वे मार्ग सुरु करण्याबाबत चर्चा झाली होती.
गेलेफू आणि आसाम दरम्यान रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर, आणखी अनेक ठिकाणे रेल्वेने जोडण्याची योजना सध्या आखण्यात येत आहे.