King Leopold: हिटलर नाही, तर 'हा' राजा इतिहासातील क्रूर कर्मा; तब्बल 2 कोटी लोकांचा घेतलेला जीव
पण तुम्ही जर राजा लिओपोल्ड II बद्दल जाणून घेतलं तर मात्र तुम्ही हिटलरला नावं ठेवणं नक्कीच सोडून द्याल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेल्जियमचा राजा लिओपोल्ड II याचा जन्म 183 वर्षांपूर्वी 9 एप्रिल 1835 रोजी झाला होता. तो वर्णद्वेषी राक्षस आणि रानटी होता.
लिओपोल्ड II ला आधुनिक जगाच्या इतिहासातील सर्वात वाईट वर्णद्वेषी नरसंहार म्हटलं गेलं आहे.
बेल्जियमचा राजा लिओपोल्ड यानं आपल्या वसाहतवादी राजवटीत काँगो या आफ्रिकन देशात 2 कोटी लोकांची हत्या केली होती.
जर्मनीचा हुकूमशहा हिटलरनं 2 दशलक्ष ज्यूंची हत्या केली, तर राजा लिओपोल्डनं लाखो लोकांची झोप उडवली.
1885 मध्ये बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा आपल्या सैन्यासह आफ्रिकन देश काँगोला पोहोचला होता.
किंग लिओपोल्ड II यानं 1885 ते 1908 पर्यंत काँगोमध्ये अत्याचार केले. या दरम्यान त्यांनं कृष्णवर्णीय लोकांना बंधनकारक मजूर करायला लावलं.
किंग लिओपोल्ड दुसरा काँगोमध्ये राहणाऱ्या लोकांचे हात पाय कापायचा आणि त्यांच्या शरीराचे अवयव प्रदर्शनात दाखवायचा.