Richest Women in History : इतिहासातील सहा श्रीमंत महिला, ज्यांच्याकडे होती अफाट संपत्ती
आज त्या महिलांची नाव इतिहासातील श्रीमंत महिलांच्या यादीत नोंद आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरजिया सुलतान : तेराव्या शतकात भारतात, रजिया सुलतान सिंहासनावर बसणारी पहिली महिला मुस्लिम शासक बनून परंपरा मोडली.
रजिया सुलतानच्या निर्भय नेतृत्वामुळे दिल्लीत स्थिरता आणि समृद्धी आली. तिची राजवट महिलांच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणा ठरली आणि त्या काळात ती सर्वात श्रीमंत महिला होती.
वू जेटियन : प्राचीन चीनमध्ये, सम्राज्ञी वू जेटियनने परंपरा मोडीत काढली आणि चीनच्या इतिहासातील एकमेव महिला शासक बनली.
सातव्या शतकातील राज्यकलेतील लष्करी रणनीती आणि प्रशासनातील वू जेटियनच्या प्रभुत्वामुळे चीनमध्ये समृद्धी आणि स्थिरतेचे युग सुरू झाले. महाराणी वूच्या दूरदर्शी धोरणांमुळे शिक्षण आणि समानतेला चालना मिळाली.
इजिप्तची क्लियोपात्रा VII ला इजिप्तचा फारो असंही म्हटलं जायचं. क्लियोपात्रा VII एक चतुर मुत्सद्दी होती. तिने आपल्या लोकांना एकत्र करून आणि रोमशी युती करून राजकीय कौशल्य दाखवून दिलं. त्यावेळी तिच्याकडे सर्वाधिक संपत्ती होती. असे म्हटले जाते ,क्लियोपेट्राने ज्युलियस सीझरच्या मुलाला जन्म दिला आणि नंतर तिच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मार्क अँटनीशी लग्न केले.
जहाँआरा बेगम : 17 व्या शतकातील भारतातील मुघल साम्राज्यादरम्यान, सम्राट शाहजहानची सर्वात मोठी मुलगी, जहांआरा बेगमने साम्राज्याच्या वास्तुकला आणि शाही खजिन्याची भव्यता हाताळली आणि अनेक थर्मिक योजनांना निधी दिला. तिला मुघल काळातील सर्वात श्रीमंत राजकुमारी देखील म्हटले जातं.
कॅथरीन डी मेडिसी : फ्रेंच धार्मिक युद्धांच्या अशांत काळात कॅथरीन डी मेडिसी एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आली. तिला 16 व्या शतकात फ्रान्सची राणी रीजेंट म्हणून ओळखलं जातं. त्याकाळी तिच्याकडे सर्वाधिक संपत्तीही होती.
खदिजा बिंत खुवायलिद सहाव्या शतकात मक्कनच्या बाजारपेठेत एक व्यावसायिक स्त्री म्हणून उदयास आली. पतीच्या निधनानंतर तिने संपूर्ण व्यवसाय सांभाळला आणि अनेक देशांमध्ये पसरवला. तिने त्याकाळच्या अनेक पुरुष व्यावसायिकांना मागे टाकलं होतं. तिचा व्यवसाय संपूर्ण खंडांत पसरला होता.