Queen Cleopatra : जगाच्या इतिहासातील सर्वात सुंदर राणी, सौंदर्यासाठी करायची गाढवाच्या दुधाने अंघोळ
इजिप्तची राणी क्लियोपात्रा ही जगातील सर्वात सुंदर राणी मानली जाते. वडीलांनंतर इजिप्तच्या सिंहासनावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी क्लियोपात्राने आपल्या दोन सख्ख्या भावांशी लग्न केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराणी क्लियोपात्राने अनेक वर्ष इजिप्तवर राज्य केलं, पण वयाच्या 38 व्या वर्षी राणी क्लियोपात्राचं निधन झालं. तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.
राणी क्लियोपात्राने 51 ईसापूर्व पासून 30 पूर्व या काळात तिने प्राचीन मिस्त्र म्हणजेच इजिप्तवर राज्य केलं. सुमारे 21 वर्ष राणी क्लियोपात्राने इजिप्तवर राज्य केलं.
अनेक इतिहासकारांच्या मते, क्लिओपात्रा जगातील सुंदर स्त्रियांपैकी एक होती. क्लियोपात्रा सुंदर दिसण्यासाठी दररोज सकाळी गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची.
क्लियोपात्राच्या आंघोळीसाठी वापरल्या जाणार्या गाढवाच्या दुधात शेकडो गुलाबाच्या पाकळ्याही टाकल्या जायच्या.
क्लियोपात्रा दररोज गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची. राणी क्लियोपात्रा तिच्या अंगावर जो परफ्यूम वापरत असे, तो तयार व्हायला अनेक महिने लागत असतं.
राणी क्लियोपात्रा खूप महत्वाकांक्षी होती. तिने सत्ता आणि सिंहासनासाठी तिच्या सख्ख्या भावांशी लग्न केलं.
राणी क्लियोपात्राने कट रचून ज्युलियस सीझरसह, तिच्या दोन भावांना ठार मारलं आणि कारण नंतर ती एकटी इजिप्तच्या सिंहासनावर राज्य करू शकेल.
इजिप्शियन राणी क्लियोपात्राबद्दल असं सांगितंलं जातं की, त्या काळात संपूर्ण जगात तिच्यापेक्षा सुंदर कुणीही नव्हतं.