Super Blue Moon: वाह! आकाश निळ्या चंद्राने उजळलं; फोटोतून पाहा चंद्राची सुंदर दृश्यं
भारताचं मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाल्याचा आनंद देशभरात साजरा होत असताना आज चंद्राचं वेगळं रुप आकाशात पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा असून चंद्राचं वेगळं रुप पाहायला मिळत आहे.
आकाशात एक दुर्मिळ सुपर ब्लू मूनचं दृश्य अवतरलं आहे.
वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असून सुपर ब्लू मून ही घटना दशकातून एकदाच घडत असल्याचं खगोलीय शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
चंद्राचं हे रुप डोळ्यांची पारणं फेडणारं आहे.
आकाशात एकाचवेळी पूर्ण चंद्र, सुपरमून आणि ब्लू मून एकत्र दिसत आहे, यालाच खगोलीय भाषेत 'सुपर ब्लू मून'म्हणतात.
आकाशात 'सुपर ब्लू मून' पाहण्याची आज पर्वणी ठरली आहे.
सोशल मीडियावरही सध्या सुपर ब्लू मून ट्रेंड होत असून नेटीझन्सकडून आपल्या मोबाईलमध्ये चंद्राचा हा नजारा कैद केला जात आहे.
सोशल मीडियावरही ब्लू मूनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नेटकरी अपलोड करत आहेत.
चंद्राच्या प्रकाशाने आज अनेक शहरं तेजोमय झाली आहेत.