PHOTO: काय सांगता...! पृथ्वीच्या पोटात, तब्बल 643 किलोमीटर खोल सापडला भला मोठ्ठा महासागर
शास्त्रज्ञांनी पृश्वीच्या पोटात एक मोठ्ठा महासागर शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांनी नुकतंच पृथ्वीच्या कवचाखाली पाण्याचा भला मोठ्ठा साठा शोधून काढला आहे. हे पाणी घन, द्रव किंवा वायूच्या स्वरुपात नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे विश्व रहस्यांनी भरलेले आहे. अवकाशात अनेक प्रकारचे धातू शोधले जात आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वीवरही काही नवे शोध घेतले जात आहेत. आता पृथ्वीच्या आत आणखी एक नवी गोष्ट सापडली आहे. शास्त्रज्ञांनी नुकतेच पृथ्वीच्या कवचाखाली पाण्याचे साठे शोधून काढले आहेत.
शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या पोटात पाण्याचा एक महासागर शोधून काढला आहे, जो आपल्या जमिनीखाली 643 किलोमीटर खाली खडकात असून गोठलेल्या स्वरुपात आहे.
ज्या खडकात हे पाणी सापडलं आहे, त्याचं नाव 'रिंगवूडाइट रॉक' असं आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक म्हणतात की, हा एक मेंटल रॉक आहे, ज्याच्या आत पारंपारिक स्पंज सारख्या अवस्थेत पाणी साठलं गेलं आहे.
या खडकाच्या आतील पाणी घन, द्रव किंवा कोणत्याही वायूच्या स्वरूपात नाही, ही एक अद्वितीय बाब आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की, रिंगवूडाइट खडक हा स्पंजसारखा असतो, जो पाणी शोषून घेतो. त्याच्या शोधात गुंतलेले भूभौतिकशास्त्रज्ञ स्टीव्ह जेकबसन यांनी हे उघड केलं आहे.
स्टीव्ह म्हणतात की, हा रॉक काहीसा खास आहे, जो हायड्रोजनला आकर्षित करतो आणि पाणी स्वतःमध्ये शोषून घेऊ देतो. या खनिजामध्ये भरपूर पाणी असतं.
स्टीव्ह म्हणतात की, आमचे शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून अचानक नाहीशा झालेल्या खोल पाण्याचा शोध घेत आहेत आणि यामुळे आम्हाला हा शोध समजण्यास आणखी मदत होऊ शकते.
शास्त्रज्ञ भूकंपाचा अभ्यास करत असताना ही बाब समोर आली. त्याच्या लक्षात आलं की, सिस्मोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली शॉकवेव्ह पकडत आहेत. यानंतर सखोल माहिती घेतल्यानंतर रिंगवूडाईटमध्ये साचलेलं पाणी असल्याचं दिसून आलं होतं.
शास्त्रज्ञांच्या मते, खडकात फक्त एक टक्का पाणी असतं. यावरून हे समजू शकतं की, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली महासागरांपेक्षा तिप्पट पाणी आहे.