मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
सध्या सगळीकडे बोत्सवाना येथे सापडलेल्या एका हिऱ्याची जगभरात चर्चा चालू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा हिरा जगातील दुसरा सर्वाधिक मोठा हिरा आहे. हा हिरा तब्बल 2492 कॅरेटचा आहे.
हा हिरा बोत्सवाना येथील एका खाणीत सापडला असून ही खाण लुकारा डायमंड या कॅनडीयन फर्मच्या मालकीची आहे.
बोत्सवानाची राजधानी असलेल्या गॅबोरोनच्या उत्तरेस सुमारे 500 किमी अंतरावर असलेल्या कारोवे या खाणीत हा हिरा आढळला आहे.
बोत्सवाना सरकारच्या म्हणण्यानुसार दक्षिण आफ्रिकन राज्यांत आढळलेला हा सर्वांत मोठा हिरा आहे.
बोत्सवाना हा देश जगात सर्वांत मोठा हिरे उत्पादक देश आहे. जगभरातील साधारण 20 टक्के हिरे उत्पादन एकट्या बोत्सवाना येथे होते.
या हिऱ्याचा शोध घेण्यासाठी मेगा डायमंड रिकव्हरी एक्स-रे तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.
याआधी 1095 साली दक्षिण आफ्रिकेत सर्वांत हिरा सापडला होता. 3016 कॅरेटच्या या हिऱ्याचे नाव 'कलिनन हिरा' असे आहे.