Women Voting Rights : आजही 'या' देशातील महिलांना मतदानाचा हक्क नाही, यामागचं कारण नेमकं काय?
असे अनेक देश आहेत जिथे महिलांना वाहन चालवण्याचा आणि मतदान करणे यासारखे अधिकार नव्हते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, आता अशा देशांची संख्या झपाट्याने कमी झाली असून महिलांच्या हक्कांबाबत देश जागरूक झाले आहेत
सौदी अरेबियामध्ये 2015 नंतर महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.
पण, जगात आजही एक असा देश आहे, जिथे महिलांना मतदानाचा अधिकार नाही.
व्हॅटिकन सिटी हा जगातील एकमेव देश आहे जिथे महिलांना मतदानाचा अधिकार नाही.
व्हॅटिकन सिटीमध्ये पोपच्या मृत्यूनंतरच पुढील निवडणुका होतात. या निवडणुकीत कार्डिनल म्हणजेच जे पुरुष आहेत, ते मतदान करतात.
सौदी अरेबियामध्येही याआधी महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, मात्र 2015 मध्ये पहिल्यांदाच महिलांना हा अधिकार देण्यात आला.
तत्कालीन राजा अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अल-सौद यांनी 2011 मध्ये याची घोषणा केली होती.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचं सांगितलंय.
अफगाणिस्तानात महिलांवर अनेक विचित्र बंधने लादली जात आहेत, ज्यामुळे महिलांचं जगणं कठीण झालं आहे.