US Evacuation : 'अमेरिकामुक्त' अफगाणिस्तान; अखेर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतलं, तालिबान्यांकडून आनंद व्यक्त
अफगाणिस्तानाचा ताबा तालिबाननं घेतल्यानंतर आज 20 वर्षांनी अमेरिकेचं सैन्य माघारी परतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेनं अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्याची आणि अमेरिकन नागरिकांसह अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सुरु केलेल्या लष्करी मोहिमेच्या शेवटाची घोषणा केली. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याचे शेवटेचे काही फोटो...
अमेरिकेने अफगाणिस्तानमधील राजनैतिक उपस्थितीही संपवली आणि कतारला स्थलांतरित केली.
शेवटचं सी-17 विमान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी रवाना झालं.
अमेरिकेनं आपल्या सैनिकांना अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघारी घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम तारिख दिली होती. त्यापूर्वीच अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतलं आहे.
काबूल विमानतळावर अमेरिकन वायू सेनेच्या एका मोठ्या विमानात अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर्सही देशात रवाना करण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सैन्यानं अफगाणिस्तान सोडल्यानंतर म्हणाले की, ज्या अफगाण नागरिकांना देश सोडायचा आहे, त्यांच्यासाठी कोणतीही डेडलाइन नाही.
बायडन म्हणाले की, अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना देशातून बाहेर पडायचं असेल तर अमेरिका शक्य ती मदत करेल.
तालिबाननं देशातून अमेरिकन सैन्याच्या वापसीनंतर अफगाणिस्तान पूर्णपणे स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, सर्व अमेरिकन सैन्य काबुल विमानतळावरुन रवाना झाले आहेत. आता आमचा देश पूर्णपणे स्वतंत्र आहे.
अमेरिकेची विमानं रवाना होताना पाहून तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला.