PHOTO : का साजरा केला जातोय International Dog Day? जाणून घ्या
दरवर्षी 26 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करण्यात येतो. श्वान किंवा कुत्रा हा मनुष्याचा लाडका प्राणी आहे, तसंच तो मनुष्याचा प्रामाणिक मित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुत्र्यांच्या संदर्भात काम करणाऱ्या कॉलिन पेग या व्यक्तिने 26 ऑगस्ट 2004 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा केला.
कॉलिन पेग 10 वर्षाचा असताना त्याने 26 ऑगस्ट या दिवशी पहिल्यांदा एका कुत्र्याला अॅडॉप्ट केलं होतं.
या दिवसाचे स्मरण म्हणून त्याने 26 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करायला सुरुवात केली.
कुत्रा आणि मानवाचे संबंध हे अतिशय सौदार्हपूर्ण आहेत. कुत्रा हा आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतो आणि त्याच्या संपत्तीचे रक्षण करतो.
जगभरात आणि भारतातही कुत्र्याच्या अनेक प्रजाती सापडतात.
भारतामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याचं दिसून येतंय.